कोरोना: ठाणे शहराच्या लॉकडाऊनमध्ये 31 जुलैपर्यंत वाढ

फोटो स्रोत, Getty Images
ठाणे शहरातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली असून 31 जुलैपर्यंत शहरात लॉकडाऊन सुरू असणार आहे. ठाणे शहराचा लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत होता.
12 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 19 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठाण्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.
12 जुलै 19 जुलै दरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम कायम राहतील. मात्र यात घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा देण्यात आली आहे. बाकीच्या अटी व नियम पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आधीचे हेच नियम कायम राहतील :
- अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूंच्या ने-आण व्यतिरिक्त इतर सर्व कारणांकरता ठाणे महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.
- इंटरसिटी, एसटी, मेट्रो, टॅक्सी, रिक्षा यांच्या वाहतुकीला परवानगी नाही. तथापि आपात्कालीन वैद्यकीय सेवेकरता प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल.
- ड्रायव्हरसह केवळ एका प्रवाशास प्रवास करण्याची अनुमती असेल. परवानगी असलेल्या जीवनावश्यक वस्तू,आरोग्य सेवा आणि या ऑर्डरअंतर्गत मान्य कृतींकरता परवानगी असेल.
- सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे तसंच खाजगी ऑपरेटरांकडून चालवले जाणारे कामकाज बंद असेल. तथापि बाहेरून येऊन, बाहेर जाणाऱ्या टूरिस्ट वाहनांना परवानगी असेल.
- ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्याचं सक्त पालन करणं आवश्यक आहे. पालन न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागेल. घरात नियमांचं पालन न केल्यास महापालिकेतर्फे संस्थात्मक क्वारंटीन केलं जाईल.
- नागरिकांनी घरातच राहावं, परवानगी असलेल्या कामांसाठीच बाहेर पडू शकतात.
- अत्यावश्यक बाबींच्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी नाही.
- व्यावसायिक आस्थापनं, कार्यालयं, कार्यशाळा, गोदामं बंद राहतील. मात्र आवश्यक वर्गात मोडणारी उत्पादन युनिट्स, डाळ आणि तांदूळ गिरणी, खाद्यसंबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य आणि चारा अशा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेली मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू राहतील.
- सरकारी कार्यालय कमीतकमी मनुष्यबळामध्ये सुरू राहतील. चेक काऊंटरजवळ तीन फूटांचं अंतर राखणं आवश्यक आहे. आवारात हात धुण्यासाठी व्यवस्था तसंच सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.
ठाण्यात काय सुरू राहील
- बँका, एटीएम्स, विमा संबंधित कार्यालयं
- प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
- आयटी आणि आयटीईएस, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवांसह
- पुरवठा साखळी आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक
- कृषी वस्तू आणि उत्पादने यांची वाहतूक, आयातनिर्यात
- अन्न, फार्मा आणि वैद्यकीय उपकरणं
- पाळीव प्राण्यांसाठी बेकरी आणि पशुवैद्यकीय आस्थापनं
- रुग्णालयं, फार्मसी आणि ऑप्टिकल स्टोअर्स.
- फार्मा मॅन्युफॅक्चरिंग, व्यापार आणि वाहतूक
- पेट्रोलपंप, एलपीजी गॅस, तेल एजन्सी, गोदामं आणि संबंधित वाहतूक कार्य
- सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा
- आवश्यक सेवांसाठी सहाय्यकारी यंत्रणा
- मद्यविक्रीची दुकानं होम डिलिव्हिरीसाठी उपलब्ध
- लग्नविषयक कार्यक्रमाला पन्नास माणसांच्या उपस्थितीला परवानगी
दरम्यान, काही वेळापूर्वीच पुण्यात दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यातील ज्या भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय, तिथे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?


फोटो स्रोत, Getty Images
'ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या चार महापालिका येतात. अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका कार्यक्षेत्रात येतात. या सर्वच ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नागरिकांनी घरातच थांबणे अपेक्षित आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. कॅब, प्रायव्हेट गाड्यांमध्ये 1+2 अशा प्रवासाला परवानगी आहे.
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी-
बाईकवर एका राईडरला परवानगी आहे. विनाकारण बाहेर फिरू नका, सर्व ठिकाणी कडक नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात येईल. अनेक वाहनं जप्त करण्यात आली आहेत, हजारो चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे आयुक्तालय परिसरातील एंट्री-एक्झिट पॉइंट्सवर काटेकोर चेकिंग करण्यात येईलट, असं आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे.
कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत याआधीच अशा प्रकारच्या लॉकडाऊनचे संकेत दिले होते. यापुढे त्या त्या भागात स्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी म्हंटलय. त्यांची संपूर्ण मुलाखत तुम्ही इथं पाहू शकता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























