कोरोना चाचणीच्या दरात घट, सामान्यांना दिलासा

कोरोना, रॅपिड एंटीजन
फोटो कॅप्शन, कोरोना चाचणी
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये कमालीची घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाबाधेमुळे अनेकांना आर्थिक नुकसान होतंच आहे आणि चाचणीही काहीशी महाग होती. त्यामुळे ही चाचणी स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये तब्बल 600 ते 800 रुपयांची कपात केली असून आज 8 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होतोय. त्यामुळे कोरोनाची चाचणी अवघ्या 1200 रुपयांत होणार आहे.

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना चाचणीच्या दरात कपात करण्याचा सरकारचा निर्णय

देशात आणि विशेषतः राज्यात कोरोना उद्रेकामुळे अक्षरशः हलकल्लोळ सुरू आहे. राज्य शासन प्रयत्न करत असलं तरी कोरोनाची बाधा झालेल्यांना उपचारांसाठी बरेच पैसे मोजावे लागत आहेत.

खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांना लाखांची बिलं आल्याच्या बातम्या आपण दिवसाआड ऐकत असतो. कोरोनाच्या चाचणीलाही बावीसशे रुपये यापूर्वी मोजावे लागत होते. पण, या दरांमध्ये घट करण्याच्या उद्देशाने शासनाने आरटीपीसीआर तपासणीचे म्हणजेच कोरोनाच्या चाचणीचे दर तपासणीसाठी एक समिती गठीत केली होती.

कोरोना
लाईन

या समितीने, लॅब्सशी चर्चा करून आणि उपलब्ध साधनांची पाहणी करून शासनाला अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, शासनाने नवे दर जाहीर करणारा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. या निर्णयानुसार, कोव्हिड केअर सेंटर, हॉस्पिटल, क्वॉरंटाईन सेंटरमध्ये चाचणी दिल्यास 1600 रुपये घेतले जातील.

एखाद्या लॅबमध्ये जाऊन चाचणी केली तर 1200 रुपये होतील. तर, रुग्णाच्या घरी जाऊन चाचणी केली तर 2000 रुपये लागतील. पूर्वीच्या दरांपेक्षा ही मोठी दरकपात असल्याचं बोललं जातंय.

शासकीय आदेश

कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर राज्यातल्या वैद्यकीय उपकरणांच्या, साधनांच्या, औषधांच्या किमती वाढल्या होत्या.

शासन निर्णय

त्यामुळे पूर्वी कोरोनासाठीची चाचणीही महाग होती. मात्र, गेल्या काही दिवसांत लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने औद्यौगिक संस्था सुरू झाल्या. त्यामुळे वैद्यकीय साधनांची उपलब्धता वाढली. म्हणूनच शासनाने कोरोना चाचणीचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)