संसदेचं पावसाळी अधिवेशन: 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

फोटो स्रोत, Hindustan Times
लोकसभेचे 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. 13 आणि 14 सप्टेंबरला लोकसभेचे संसदेचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं. सत्रापूर्वी प्रत्येक खासदाराची अनिवार्य कोरोना चाचणी करण्यात आली होती.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या खासदारांमध्ये भाजपच्या 12 नेत्यांचा समावेश आहे. वायएसआर काँग्रेसचे 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदाराचा समावेश आहे.
भाजपच्या सुकांता मजुमदार यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्वीट करून सांगितलं होतं. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
785 खासदारांपैकी 200 खासदारांचं वय 65पेक्षा जास्त आहे. वयापरत्वे त्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे.
आतापर्यंत 7 केंद्रीय मंत्री आणि 25 खासदार तसंच आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.
अनेक खासदार आणि आमदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अत्यंत कडेकोट वातावरणात संसदेच्या सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत सदनात आसनव्यवस्था करण्यात आली होती.
उपस्थितीसाठी मोबाईल अपची व्यवस्था करण्यात आली होती. सत्रापूर्वी प्रत्येक खासदाराला कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती.
सगळ्यांची चाचणी होणार
राज्यसभेनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, संसदेच्या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाईल.
राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी कोरोना चाचणी केली. त्यानंतर त्यांनी सर्व सदस्यांना आवाहन केलं की, अधिवेशन सुरू होण्याच्या 72 तास आधी RT-PCR चाचणी करून घ्या.
खासदारांसाठी संसदेच्या आवारातच चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. सत्र सुरू होण्याआधीच चाचणीचा अहवाल खासदारांना दिला जाईल, असं राज्यसभा सचिवालयाने सांगितलं आहे.
खासदारांचे वाहनचालक आणि इतर कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली जाईल. कुणीही पॉझिटिव्ह आढळल्यास कोरोनाच्या नियमांनुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल.
प्रत्येक खासदाराला कोरोना किट देण्यात येईल. त्यात मास्क, सॅनिटायझर आणि इतर आवश्यक वस्तू असतील.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























