तारा सिंहः भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचं मुंबईत निधन

सरदार तारा सिंह
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचं निधन झालं आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान तारा सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तारा सिंह यांच्या निधनाची माहिती ट्विटरवरून दिली. "त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रार्थना," अशा भावनाही किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या.

किरीट सोमय्या

तारा सिंह हे मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार होते. या मतदारसंघातून ते सलग चारवेळा निवडून विधानसभेत गेले होते. मात्र, 2019 साली तारा सिंह यांना भाजपनं तिकीट नाकारलं होतं.

सरदार तारा सिंह यांची राजकीय कारकीर्द नगरसेवक म्हणून सुरू झाली.

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली अर्पण करताना तारा सिंह यांच्या कारकिर्दीला उजाळा दिला. फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं, "तारा सिंह यांनी आधी नगरसेवक आणि नंतर आमदार म्हणून जवळपास 40 वर्षे लोकांची सेवा केला. लोकांमध्ये जाऊन काम करणारे ते नेते होते. लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी मोठा संघर्ष केला."

ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तारा सिंह यांना आदरांजली अर्पण करताना आठवणींना उजाळा दिला.

जितेंद्र आव्हाड

तारा सिंह यांच्या रुपाने मित्र गमावल्याची भावना आव्हाड यांनी व्यक्त केली. तसंच, विधानभवनात येताना ते खिशात चॉकलेट्स आणायचे आणि सगळ्यांना वाटायचे, अशी आठवणही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून सांगितली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सरदार तारा सिंह यांना आदरांजली अर्पण केली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने तळमळीने काम करणारे सच्चे व्यक्तीमत्व आपण गमावले आहे. सरदार तारासिंह यांचे सर्वच पक्षातील लोकांशी चांगले संबंध होते. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली," अशा भावना बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)