उद्धव ठाकरे : मेट्रो कारशेड आता आरेऐवजी कांजूरमार्ग इथं होणार

उद्धव ठाकरे
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आरे इथं मेट्रोची जी कारशेड होणार होती, ती आता कांजूरमार्ग इथं होणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी (11 ऑक्टोबर) फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

"कांजूरची जागा शून्य रुपये किमतीनं कारशेडसाठी दिली आहे. तसा निर्णयही झाला आहे. ही सरकारी जमीन जनतेच्या हितासाठी आपण वापरत आहोत," असं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आरे मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधातले गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "आरेच्या 600 एकर जागेवर जंगल घोषित करण्यात आलं आहे. तिथल्या कुणाच्याही अधिकाऱ्यावर गदा येणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जंगलाची व्याप्ती 800 एकर इतकी झाल्याचं कळालं आहे. हे जंगल मी आज घोषित करत आहे."

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे-

  • कोरोना परेदशातून आलेला पाहुणा आहे. तो घरात घुसलाय आणि जा म्हटला तरी जात नाहीये. या अशा पाहुण्याचा समाचार आपल्याला घ्यायचाच आहे.
  • अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. शेतकरी चिंतेत आहे. पण, जी जी पीकं येतील त्यांच्या आम्ही बाबतीत खबरदारी घेत आहोत. जिथं जिथं नुकसान झालं, तिथं तिथं पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
  • सरकारनं विकेल ते पिकेल धोरणाला मंजुरी दिली आहे. ज्याला हमखास भाव मिळेल, ते पिकवण्याचा आपल्या सरकारचा आग्रह आहे.
  • महा-ओनियन हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत शीतगृहं आणि गोदामं दिली जातील.
  • केंद्राच्या कृषी कायद्याविषयी सरकार विचार करत आहे. या कायद्यातील जे बरोबर असेल त्याचा स्वीकार करू, पण अयोग्य असेल तर ते स्वीकारलं जाणार नाही. शेतकरी नेते, संघटना या सगळ्यांशी चर्चा सुरू आहे.
  • कोरोनाविरुद्धच्या मोहिमेत नागरिकांकडून अजूनही थोडा कमी प्रतिसाद मिळत आहे. बेजबाबदारपणा आणि भीती याला कारणीभूत आहे. पण तुम्ही घाबरायचं कारण नाही. जेवढं उशीरा दवाखान्यात याल, तेवढा तुमचा जीव धोक्यात घालत आहात.
  • कदाचित जगातलं महाराष्ट्र एकमेव राज्य असं असू शकेल जिथं कडक कायदे न करता जनतेला विश्वासात घेऊन आपण कोरोनाविरुद्धचं युद्ध लढत आहोत.
  • सरकार मुंबईमध्ये लोकलच्या फेऱ्या वाढवून मागत आहे. राज्यांतर्गत रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
  • लस येईल तेव्हा येईल, पण मास्क आपला ब्लॅक बेल्ट आहे.
  • पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण करू नका.
  • काही जण म्हणतात हे उघडलं, ते उघडलं तर मंदिरं उघडायला काय हरकत आहे. पण, मंदिरांच्या बाबतीत मी हळूवारपणे जात आहे. करण आमच्यावर जबाबदारी आहे आणि आमचं जनतेवर प्रेम आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)