मुंबईत वीज गेल्यामुळे मुलुंडच्या कोव्हिड रुग्णालयात आग, 1 रुग्णाचा मृत्यू

मुंबई आग
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मुंबईच्या मुलुंड भागातील अॅपेक्स कोव्हिड-19 रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 82 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय.

तर, कोरोनाग्रस्त एक महिला रुग्णाची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 40 रुग्णांना फोर्टिस, मुलुंड जंबो आणि इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना पोलीस उपायुक्त प्रशांत कदम म्हणाले, "सोमवारी संध्याकाळी अॅपेक्स रुग्णालयात आग लागली. प्राथमिक माहितीनुसार जनरेटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही लाग लागली. आग लागल्यानंतर रुग्णालयातील वीज सप्लाई बंद झाला. आगीत व्हॅन्टिलेटर आणि ऑक्सिजनचे पाईप जळाले. त्यामुळे व्हॅन्टिलेटर बंद पडले. आगीचा धूर रुग्णालयातील पॅसेजमध्ये पसरला. तात्काळ रुग्णालयात गंभीर स्वरुपात उपचार घेत असलेल्या रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं." "मात्र, या आगीत 82 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या माहितीनुसार हा रुग्ण क्रिटिकल होता. रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करत असताना या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेत एक कोरोनाग्रस्त महिला रुग्ण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. अॅपेक्स रुग्णालयातून 40 रुग्णांना बाहेर काढून मुलुंडमधील इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत होते," असं पोलीस उपायुक्त प्रशांत कदम पुढे म्हणाले. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार अॅपेक्स रुग्णालयात संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी आग लागली होती. सोमवारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर भागात ग्रिड फेल झाल्याने वीज गेली झाली. मुंबईतील इतर भागात दुपारी वीज पुरवठा सुरळीत झाला असला. तरी, मुलुंडच्या काही भागात संध्याकाळी उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

अचानक वीज गेल्याने मुंबईतील रुग्णालयांना बॅकअप पॉवरवर काम करावं लागलं. मुंबई महापालिकेनेही रुग्णालयांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. अॅपेक्स रुग्णालयाच्या जनरेटरला लागलेल्या आगीचं निश्चित कारण काय. याचा पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी शोध घेत आहेत. फोर्टिस रुग्णालयाच्या प्रवक्त्यानेही एपेक्स रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर कोव्हिड-19 रुग्णांना फोर्टिसमध्ये दाखल करण्यात आलेल्या माहितीला दुजोरा दिलाय. मात्र, रुग्णांच्या परिस्थितीबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.

तुम्ही हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)