मुंबईच्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू

मुंबईच्या परळ आणि एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. अपडेट्ससाठी पहात रहा बीबीसी मराठी वेबसाईट

    शेवची हाती आलेल्या वृत्तानुसार चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांची संख्या २२ असून ३९ जण जखमी आहे. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    या घटनेसंदर्भातील ताजा तपशील वेबसाईटवर देत राहू.

    सध्या हे लाईव्ह पेज इथेच थांबवत आहोत.

    अपडेट्ससाठी पाहात रहा - बीबीसी मराठी.

  2. चौकशीसाठी स्वतंत्र समिती

    मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

    एल्फिन्स्टन-परळ रेल्वे पुलावर आज सकाळी 10.45 वाजता ऐन गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. जखमींवर मुंबईतील केइएम रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यात रेल्वेमंत्री पियूष गोयल हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

    दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

  3. 'पत्रा तोडून आम्ही लोकांचे जीव वाचवलेत', झगडूराम बरसाती जैस्वाल सांगत आहेत त्यांचा अनुभव

    व्हीडिओ कॅप्शन, 'पत्रा तोडून आम्ही लोकांचे जीव वाचवलेत, एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी नव्हता.'
  4. दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे - अशोक चव्हाण

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. आपल्याला बुलेट ट्रेनची खरंच गरज आहे का?

    आपल्याला बुलेट ट्रेनची खरंच गरज आहे का? आपल्या सामाजिक भानाबद्दल काय? असे प्रश्न दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मुंबईतल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल उपस्थित केले आहे.

  6. रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. जखमींंची संख्या ३९

    चेंगराचेंगरीच्या घटनेत आत्तापर्यंत २२ जण मृत्युमुखी पडले असून जखमींची संख्या ३९ असल्याचं केईएम रुग्मालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

  8. मृतांना एकूण १८ लाखांची मदत जाहीर

    रेल्वे पूल चेंगराचेंगरी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

    रेल्वे आणि राज्य सरकारखेरीज RailClaimTribunal यांच्याकडून ८ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना एकून १८ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. मुंबई पोलिसांनी मानले मुंबईकरांचे आभार, रक्तादान करण्याच्या आवाहनाला लगेच प्रतिसाद

    चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या रुग्णांना रक्ताची गरज होती. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी आवाहनही केलं होतं.

    मुंबईकरांच्या सकारात्मक प्रतिसादामुळं केईएम रुग्णालयात पुरेशा प्रमाणात रक्तसाठा जमा झाल्याचं मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे कळवलं आहे.

  10. 'गर्दीचे पूल तातडीनं बंद करणार'

  11. रेल्वेकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, जखमींसाठी १ लाख आणि किरकोळ जखमींना १० हजारांची मदत जाहीर

    रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेत जखमींंना १ लाख आणि किरकोळ जखमींना १० हजारांची मदत जाहीर केली आहे.

  12. 'रेल्वेला सर्वतोपरी सहकार्य करू', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन जारी

    "राज्य सरकार रेल्वेला सर्वतोपरी सहकार्य करू आणि या घटनेची सखोल चौकशी करू", असं मुख्यमंत्री म्हणाले.

  13. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन, ऐका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन जारी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  14. शेखर कपूर यांचं ट्विट

    आहे रे आणि नाही रे यांच्यातील दरी मुंबईत सर्वाधिक जाणवते. असं ट्विट शेखर कपूर यांनी केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. एल्फिन्स्टन स्टेशन

    पश्चिम रेल्वे मार्गावर एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन येतं. या स्टेशनपासून मध्य रेल्वेवरच्या परळ रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर ही घटना घडली.

    मुंबई
  16. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात, पाहा व्हीडिओ : घटनास्थळी गर्दी पण परिस्थिती नियंत्रणात

    एलफिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

    व्हीडिओ कॅप्शन, मुंबई चेंगराचेंगरीनंतरची स्थिती
  17. वीरेंद्र सेहवागचं ट्विट, 'निष्पाप लोकांचे जीव स्वस्त झाले आहेत'

    कर भरूनही निष्पाप लोक जीव गमवत आहेत, असं ट्विट वीरेंद्र सेहवागनं केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. आतापर्यंत, नेमकं काय झालं?

    - चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे, तर किमान 30 जणांवर उपचार सुरू आहेत.

    - राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यातर्फे शोक व्यक्त.

    - एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन आणि परळ रेल्वे स्टेशऩ यांना जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर सकाळी 10.30च्या जवळपास चेंगराचेंगरी झाली

    - सकाळपासून होत असलेल्या पावसानं पुलावर गर्दी झाली.

    - सकाळी 11.45 वाजता 15 मृतदेह केईएम रुग्णालयात आल्याची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी कळविली होती.

    - पुढे हाच आकडा 22 वर गेला. यात 18 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.

    -"पावसामुळं फूट ओव्हर ब्रिजवर गर्दी जमा झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यातच 22 जण मृत घोषित करण्यात आले," असं पोलीस उपायुक्त एस. जयकुमार यांनीही सांगितलं.

    - केईएम रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. पश्चिम रेल्वेचे वैद्यकीय अधिकारीही उपचारांमध्ये मदत करत असल्याचं या रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी गजानन महापुतकर यांनी कळवलं.

    मुंबई
  19. रितेश देशमुखकडून संताप व्यक्त

    अभिनेता रितेश देशमुख यांनीसुद्धा ट्विटरवर घटनेविषयी संताप व्यक्त केला.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  20. घटनास्थळी बराच वेळ गोंधळ, आता परिस्थिती नियंत्रणात

    बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयूरेश कोण्णूर यांनी सांगितलं की, घटनास्थळी बराच वेळ गोंधळाची परिस्थिती होती. आता परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.