कोरोना: पाकिस्तानात डॉक्टरांवर हल्ले का होत आहेत?-पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना : पाकिस्तानात का वाढतेय कोव्हिड-19 ग्रस्तांची संख्या?
Published

पाकिस्तानात लॉकडाऊन पूर्णतः उठवल्यामुळे कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत चालले आहेत.

लॉकडाऊन पाकिस्तानला परवडणारं नसलल्याचं या देशाचे पंतप्रधान इमरान खान यांचं म्हणणं आहे. मात्र, यामुळे पाकिस्तानातल्या कराचीत हॉस्पिटल्समधल्या इंटेनसिव्ह केअर युनिटवर कोरोनाग्रस्त रुग्णांचा ताण पडतोय.

दीड कोटी लोकसंख्येच्या या शहरांत अवघे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच बेड रिकामे आहेत.

नव्या सोयी उभारण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. पण, पाकिस्तान सरकारने लॉकडाऊन पूर्णतः उठवण्याचा निर्णय घेतल्याने तिथल्या स्थानिक प्रशासनाची आणि डॉक्टरांची डोकेदुखी वाढली आहे.

पाकिस्तानातील सद्यस्थितीबद्दल बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमाणी यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)