कोरोना संकट : शाहू महाराजांकडून या काळात काय शिकण्यासारखं आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना संकट : शाहू महाराजांकडून या काळात काय शिकण्यासारखं आहे?
Published

अवघं 48 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या शाहू महाराजांनी वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले.

मुंबईत 1896 साली प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. पण कोल्हापूर संस्थानात प्लेगचा शिरकाव शाहू महाराजांच्या उपाययोजनांमुळे उशीरा झाला.

भीती आणि अनिश्चिततेचं सावट घेऊन आलेल्या प्लेगच्या साथीत शाहूंनी जनतेला दिलासा दिला. इतकंच नाही तर त्यांनी केलेल्या उपाययोजना कोल्हापूर संस्थानातले मृत्यू कमी करण्यात यशस्वी ठरल्या होत्या.

याविषयी सांगतायत इतिहास संशोधक आणि लेखक डॉ. जयसिंगराव पवार.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)