उद्धव ठाकरेंवर शिवसेनेतले ज्येष्ठ नेते नाराज आहेत का?
येत्या नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडी सरकारला एक वर्षं पूर्ण होईल. कोरोनाचा उद्रेक आणि महाआघाडीतल्या तीन घटक पक्षांना सांभाळण्याची तारेवरची कसरत यामुळे आतापर्यंतचे नऊ महिने सरकारसाठी फारसे सोपे नव्हतेच. त्याचवेळी आता शिवसेना या मुख्य घटक पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची कुरबूर ऐकू येऊ लागली आहे.
झालंय असं की, सेना-भाजपा सरकार असताना महत्त्वाची खाती मिळालेल्या रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक केसरकर, तानाजी सावंत अशा सीनिअर नेत्यांना उद्धव ठाकरे सरकारमध्ये मात्र दुय्यम स्थान मिळाल्याची तक्रार या नेत्यांचे जवळचे कार्यकर्ते करतायत. या नेत्यांनीही आपल्या वागणुकीतून आपली नाराजी वेळोवेळी प्रगट केली आहे, मग ते भास्कर जाधव असोत किंवा तानाजी सावंत...रामदास कदमही मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून अधिवेशनात फारसे सक्रिय असल्याचं दिसलं नाही. यातलं कुणीही प्रसारमाध्यमांशी थेट बोलायला तयार नाही. पण मग त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय? उद्धव ठाकरे नेत्यांची नाराजी कशी हाताळणार. बीबीसीचा रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)