पाकिस्तानात महिलेच्या गँगरेपनंतर इमरान खान म्हणतात त्या आरोपीला 'नपुसंक' करा

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानात महिलेच्या गँगरेपनंतर इमरान खान म्हणतात त्या आरोपीला 'नपुसंक' करा
Published

दहा दिवसांनंतरही पाकिस्तानमध्ये लोक ती घटना अजून विसरलेले नाहीत. रात्री दहाच्या सुमारास लाहोरसारख्या शहरात एका महिलेला तिच्या गाडीतून ओढून शेजारच्या रानात नेलं जातं.

आणि तिच्या दोन लहानग्या मुलांसमोर तिच्यावर पाशवी बलात्कार होतो...सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान पेटून उठला आहे. महिलेसाठी न्याय मागितला जात आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी तर त्या दोन अमानवी पुरुषांवर रासायनिक नपुंसकत्व लादण्याची भाषा केली आहे.

आणि त्याचवेळी देशात, एकट्या महिलेनं इतक्या रात्री का बाहेर पडावं, असं विचारणारे लोकही आहेत. लाहोरमधून बीबीसी प्रतिनिधी सेहर बलोच यांनी केलेला हा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)