भिवंडी इमारत अपघातातून वाचलेले नातलगांच्या शोधात
Published
ठाण्याजवळ भिवंडीत सोमवारी पहाटे एक जुनी इमारत कोसळली. त्यात अनेकांचे जीव गेले तर अनेक लोक अजूनही आत अडकले आहेत.
भिवंडीच्या पटेल कंपाऊंड परिसरातली ही इमारत ‘धोकादायक’ आहे, अशी नोटीस महानगरपालिकेने याअगोदरच बजावली होती.
या इमारतीत 20 घरं होती, असं सांगितलं गेलं.
NDRF आणि अग्निशमन दल ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शर्थीने करत आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)