कुटुंबाच्या संपत्तीत समान वाटा देणारा हक्क महिलांना मिळाला पण ते खरंच सोपं आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कुटुंबाच्या संपत्तीत समान वाटा देणारा हक्क महिलांना मिळाला पण ते खरंच सोपं आहे?
Published

वडिलोपार्जित संपत्तीवर पुरुषांप्रमाणेच महिलांचाही समान हक्क आणि वाटा असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने 11 ऑगस्टला दिला. त्याआधी हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये 2005 साली सुधारणा करण्यात आली होती.

भारतात परंपरेच्या नावाखाली मुलींना पितृसत्ताक संपत्तीवरचा हक्क सोडण्यासाठी दबाव टाकला जातो. त्यामुळे केवळ कायदेशीर तरतूदीने बदल होणार नाहीत, असं तज्ज्ञ म्हणतात. आजही बहुतांश लोक कोर्टातल्या लढाईपासून दूर राहणं पसंत करतात. आपला हक्क मिळवायचा असेल तर महिला कोर्टाची पायरी चढतील का? याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा रिपोर्ट.

ही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)